मार्ग इन्स्टिट्यूट ही समाजामध्ये मानसिक आरोग्य संवर्धनाचे कार्य करण्यासाठी समर्पित असणारी संस्था आहे. समाजात मानसिक आरोग्य विषयक जागृती निर्माण करणे लोकांना आवश्यक ती जीवन कौशल्य शिकवणे आणि त्यांना आयुष्यातील ताण तणाव निर्माण करणाऱ्या परिस्थितीशी धैर्याने आणि पूर्ण क्षमतेने लढण्यासाठी तयार करणे यासाठी आमची संस्था कार्य करते.
आधुनिक काळात माणसाचा जगणं पूर्वी कधीही नव्हतं इतकं संघर्षपूर्ण आणि तणावपूर्ण झालेलं आहे पूर्वी कधीच नव्हतं इतकं आजचं जगणं गुंतागुंतीच झालेलं आहे अतिशय वेगवान बदल हे आजच्या जगण्याचं प्रमुख लक्षण म्हणता येईल ज्याच्यामुळे माणसाच्या जगण्यात पूर्वीपेक्षा अधिक गुंतागुंतीची अशी आव्हान निर्माण होत आहेत या गुंतागुंतीच्या समस्यांना तोंड देत असताना माणूस भावनिक दृष्ट्या भरकटण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे जगताना स्वतःचं अस्तित्व टिकवन हे सुद्धा जिकिरीचं आणि संघर्षपूर्ण झाला आहे कुटुंबात आणि समाजात जगताना निर्माण होणाऱ्या आव्हानांना सामोरे जाताना या सगळ्यांमध्ये स्थिर राहणं आणि स्वतःचं मानसिक समाधान टिकवणे हे एक मोठं आव्हान आहे.
जगताना निर्माण होणाऱ्या या आव्हानांना या ताणतणावांना या संघर्षाला सक्षमतेने सामोर जाण्यासाठी आम्ही “मार्ग इन्स्टिट्यूट” मध्ये लोकांना मदत करतो.
मानसिक आरोग्य विषयक जाणीव आणि जागृती निर्माण करणे, लोकांना आपला ‘स्व’ अधिक चांगल्या तऱ्हेने समजून घेण्यासाठी मदत करणे,आणि समाधानी जगण्याचं महत्त्व लोकांना समजावून देणे हे आमचं “मिशन” आहे.