MARG COUNSELLING & PERSONALITY DEVELOPMENT CENTRE
Live with Your...."SELF" happily, by understanding it better
आम्ही आपल्याला मदत करू शकतो का ?

नात्यांचा आणि भावनांचा गुंता होऊन, डोकं आऊट झालंय..? जगणं नरक झालंय…?

हा भावनिक गुंता हळुवार हाताने सोडवायला आम्ही आपल्याला मदत करू शकतो व्यावसायिक तज्ञ समुपदेशकाची मदत घ्या.

सल्लामसलत करण्यासाठी कॉल करा
आमच्या सेवा

आमच्याद्वारे प्रदान केलेल्या व्यावसायिक सेवा

मी परिचय करून देतो

“मार्ग“ ही आमची संस्था मानसिक आरोग्य संवर्धन या क्षेत्रातील कामासाठी समर्पित आहे. लोकांना आवश्यक त्या जीवनकौशल्यांचे प्रशिक्षण देऊन, आयुष्यातील दैनंदिन ताणतणावांना सामोरे जाण्यासाठी सक्षम करणे, हे काम प्रामुख्याने “मार्ग ” च्या माध्यमातून केले जाते.

आधुनिक काळातील आपलं जगणं, हे पूर्वी कधीच नव्हतं, इतकं गुंतागुंतीचं, संघर्षमय, आणि तणावपूर्ण झालं आहे. अतिशय वेगाने होणारे बदल हा आजच्या आधुनिक जगण्यातील परवलीचा शब्द झाला आहे. या वेगवान बदलांनी आपल्या आयुष्यात अनेक गुंतागुंतीची आव्हाने निर्माण केली आहेत. प्रगती तर कठीणच, पण नुसतं टिकून राहणं सुद्धा संघर्षमय झालं आहे. रोजच्या आयुष्यात, सामाजिक, कौटुंबिक समस्यांमुळे, भावनिक तणावाला तोंड द्यावं लागतं आहे.

“मार्ग” च्या माध्यमातून आम्ही आपल्या क्लायंट्सना आयुष्यातील याच आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मानसशास्त्रीय समुपदेशनाचा वापर करून मदत करतो. आम्ही त्यांना मदत करतो “त्यांचा” “मार्ग ” शोधण्यासाठी.

सतत विचारले जाणारे प्रश्न

कौन्सिलिंग ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. या प्रक्रियेत कौन्सिलर्स काही मानसशास्त्रीय तंत्रांचा वापर करतो. तुमच्या भावाधिक समस्यांच्या बाबतीत तुमच्यामध्ये एक जाणीव आणि जागृती निर्माण करण्यासाठी कौन्सिलर या तंत्रांचा वापर करत असतो. तुमच्या समस्यांवरची उत्तर तुम्हालाच सापडावीत, यावर या प्रक्रियेचा भर असतो. कमीत कमी एक, किंवा एकापेक्षा अधिक सत्रांमध्ये ही प्रक्रिया फार पडते. एका सत्राचा कालावधी एक तास इतका असतो.

रोजचे आयुष्य जगत असताना ज्या घटना, विचार, किंवा भावना तुम्हाला सातत्याने मानसिक त्रास देत असतात, ताण तणाव निर्माण करत असतात, अशा घटना, विचार, किंवा भावना यांच्या बद्दल मनमोकळेपणाने चर्चा करण्याची, त्यांचं स्वरूप समजावून घेण्याची एक संधी म्हणजे कौन्सिलिंग.
एक प्रशिक्षित आणि तज्ञ कौन्सिलर तुम्हाला एक निव्वळ व्यावसायिक आणि विश्वासार्ह असं वातावरण उपलब्ध करून देतो की जिथे तुम्ही तुमच्या मनातील खाजगी गोष्टी विश्वासाने व्यक्त करू शकता. या संवादातून तुम्हाला तुमच्या विचार भावना आणि घटना यामधील नेमका त्रास देणारा घटक कोणता याचं नव्याने आकलन होतं आणि त्यातील अविवेकी भाग वगळून व्यक्ती स्वतःच्या वर्तनात योग्य तो बदल घडवून आणण्यास सक्षम होते.

ज्याला आपल्या ताणतणावाची आणि मानसिक त्रासाची कारण मुळातून समजून घ्यायचे आहेत आणि जो स्वेच्छेने स्वतःच्या विचार आणि वर्तनाविषयी चर्चा करायला तयार आहे अशा कोणाहीसाठी.

होय नक्कीच तुम्ही तुमच्या आयुष्यातील बोललेली प्रत्येक खाजगी गोष्ट ही पूर्णपणे गुप्त ठेवली. तुमच्या आयुष्यातील तुम्ही उघड केलेल्या सर्व खाजगी गोष्टींबद्दल गुप्तता बाळगणे हा कौन्सिलरच्या व्यावसायिक नीतिमत्तेचा सर्वोच्च घटक आहे. त्यामुळे तुम्ही बोललेला प्रत्येक शब्द हा पूर्णपणे गुप्त ठेवला जातो.

नाही. हा कौन्सिलिंग बद्दलचा गैरसमज आहे. कौन्सिलर्स कधीही सल्ला देत नाहीत, किंवा आपल्या समस्यांना तयार उत्तरे कधीही देत नाहीत.
आपल्या समस्या सोडवण्यासाठी आपल्याशी एक व्यावसायिक विश्वासार्ह नातं निर्माण करणे, आणि आपल्या समस्यांबद्दल आपल्यामध्येच, नवीन जाणीव आणि जागृती निर्माण करणे, यासाठी आवश्यक असणाऱ्या कौशल्य आणि क्षमता यांबद्दल कौन्सिलर्स ने विशेष व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेलं असतं. आपल्या जगण्यातील आणि वर्तनातील त्रुटी आपल्या जाणीवेश आणून देणे आणि त्या सोडवण्यासाठी आपल्याला सक्षम करणे यावर कौन्सिलिंग प्रक्रियेचा भर असतो. प्रत्येक व्यक्ती आणि तिचं जगणं हे नेहमीच एकमेवाद्वितीय असतं. त्यामुळे त्यासाठी तयार उत्तर अस्तित्वात नसतात.

कौन्सिलर ची चर्चा करताना तुमच्याबरोबर खरं तर तिसरं कोणीही असू नये. परंतु पहिल्या सत्रामध्ये जर तुम्हाला एकट वाटत असेल, किंवा अनोळखी कौन्सिलरशी एकट्याने बोलण्यास संकोच वाटत असेल. तर तुम्ही तुमच्या बरोबर तुमचा विश्वास असलेली एखाद्या व्यक्तीला बरोबर नेऊ शकता.
परंतु एकदा विश्वास निर्माण झाल्यावर तुम्ही एकट्याने बोलणं हे तुमच्या हिताचं असतं.

त्यासाठी तुम्ही फक्त आम्हाला फोन करायचा आहे. आणि तुमची भेटीची वेळ निश्चित ठरवून घ्यायची आहे.

तुमच्याशी संपूर्णपणे अनोळखी असणं हा खरंतर तुमच्या काउंसलरचा सगळ्यात प्रभावी गुण आहे.
त्यामुळे तो एक पूर्णपणे तटस्थ व्यक्ती असतो. त्यामुळे तो तुमच्याकडे आणि तुमच्या समस्यांकडे अत्यंत तटस्थ दृष्टिकोनातून पाहू शकतो त्यामध्ये पूर्वग्रह नसतात त्यामुळे कोणतीही भावनिक गुंतागुंत न होता तो तुमच्या वर्तनाचं आणि तुमच्या समस्येचं विश्लेषण करू शकतो.

हे तुमच्या समस्येचे स्वरूप आणि गांभीर्य यावर अवलंबून असेल. कौन्सिलिंग ही एक सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे कदाचित एकदोन सत्रातच तुमची समस्या सुटेल. किंवा तुम्हाला अनेकदा कौन्सिलर ला भेटावे लागेल.
तुमची समस्या सोडण्याच्या प्रक्रियेत तुमचा योग्य कृती पूर्ण प्रतिसाद हा खूपच महत्त्वाचा असतो.

  • या संदर्भात अनेकांनी त्यांचे अनुभव खालील शब्दात व्यक्त केले आहेत…
    मला आता पूर्वीपेक्षा शांत आणि समाधानी वाटत आहे. (कौन्सिलिंग प्रक्रियेचं तातडीचा उद्दिष्ट म्हणजे तुमच्या त्रासदायक तणावातून तुमची सुटका करणे आणि तुमचं मन शांत करणे हे असतं.)
  • मी स्वतःबद्दल आणि माझ्या नातेसंबंधात बद्दल बऱ्याच नवीन गोष्टी शिकलो.
  • मला खूप उत्साही वाटतंय माझी समस्या सुटेल असं वाटतंय त्यासाठी आवश्यक त्या गोष्टी करण्याची प्रेरणा मला या सत्रातून मिळाली आहे.
  • माझी समस्या माझं वर्तन आणि माझी विचार प्रक्रिया याबद्दल मला नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या आणि त्यातील त्रुटी स्वच्छ दिसायला लागल्या.
  • मला आता खूप आनंदी आणि आशादायक वाटतं आहे.
  • माझ्या घरचा आणि माझ्या समोरचे पर्याय या दोन्ही गोष्टी मला आता स्वच्छ समजायला लागले आहेत त्या संदर्भात योग्य असा विवेक पूर्ण आणि निश्चित निर्णय घेण्यासाठी मी आता तयार आहे.
  • केवळ सल्ला देणे किंवा मार्गदर्शन करणे म्हणजे कौन्सिलिंग.
  • कौन्सिलर होण्यासाठी कोणत्याही विशेष कौशल्यांची, आणि व्यावसायिक प्रशिक्षणाची गरज नसते.
  • केवळ आयुष्याचा अनुभव हा पुरेसा असतो.
  • कौन्सिलिंग चे परिणाम हे चमत्कारासारखे आणि ताबडतोब होणारे असतात.
  • कौन्सिलिंगचा काहीही उपयोग नसतो आणि ते एक फसवं शास्त्र आहे.
  • कौन्सिलर्स ना कधीच कौन्सिलिंग ची गरज लागत नाही कारण ते स्वतः कौन्सिलर असल्यामुळे त्यांना त्यांच्या आयुष्यात कोणत्याही भावनिक समस्यांना तोंड द्यावं लागत नाही.

Submit your details to book yourself an online

Submit your details to book yourself an online